सोलापूर : विकासाचे ध्येय, सोलापूरचे परिवर्तन करू पाहणाऱ्या सुभाष देशमुखांच्या पाठीशी आपण सर्वानी उभे राहून, विक्रमी मताधिक्याने त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करा, असे प्रतिपादन प्रसिद्ध सिनेअभिनेते राहुल सोलापूरकर यांनी केले.
बुधवारी, मयूर मंगलकार्यालय येथे दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाचे भाजप, शिवसेना, रासप, रिपाई, शिवसंग्राम, रयतक्रांती महायुतीचे उमेदवार सुभाष (बापू) देशमुख यांच्या प्रचारार्थ सोलापुरातील कलावंत व साहित्य क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींची बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.
साहित्यिकांनी केलेल्या मागणीप्रमाणे नाट्यगृह बांधण्याचा बापूंनी दिलेला शब्द ते नक्की पूर्ण करतील यात शंका नाही. परंतु आपण पूर्ण शासनावर अवलंबून न राहता बी ओ टी तत्वावर, प्रत्येक विभागवार कमिटी नेमून आपला वाटा उचलण्याची गरज असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. मी फक्त सोलापूरचा, महाराष्ट्राचा नव्हे तर मी भारतीय आहे हि भावना खूप महत्वाची आहे. त्यामुळे ३७० कलम रद्द करण्याचा निर्णय किती महत्वाचा आहे याची जाणीव झाली पाहिजे, याबद्दल आपण देखल समाज प्रबोधन करावे असे प्रतिपादन राहुल सोलापूरकर यांनी यावेळी आपल्या मार्गदर्शनातून केले.
माणुसकीला प्रणाम करणारे नेते म्हणजे बापू प्राचार्य डॉ. श्रुतीश्री वडकबाळकर यांनी सुभाष देशमुख यांच्या पाठीशी का उभे राहावे हे सांगताना, विडी कामगारांच्या मुलींच्या उज्वल भवितव्याविषयी कार्य करण्यासाठीची बोललेली तळमळ सांगितली. सर्व स्तरातील लोकांचे अखंड सेवा करण्याचे व्रत स्वीकारलेल्या बापूंना पाठिंबा देऊ असे त्या पुढे म्हणाल्या. श्रीमंतीला सलाम करणारे नेते आज पर्यंत पहिले, बापू हे माणुसकीला प्रणाम करणारे नेते आहेत असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी हास्यसम्राट दीपक देशपांडे, जेष्ठ पत्रकार व निवेदक अरविंद जोशी, पद्माकर कुलकर्णी, विजय सातपुते, मंदार काळे, अमोल दाबले यांनी आपले मनोगत व्यक्त करत, सहकार मंत्री सुभाष देशमुख यांना महाराष्ट्रात अव्वल नंबरच्या मताधिक्याने निवडून आणण्याचा प्रयत्न सर्वजण मिळून करूया असा निर्धार केला. यावेळी अविनाश महागावकर, प्रशांत बडवे, प्रा. सुहास पुजारी, शोभा बोल्ली, गिरीश दुनाके, संदीप जाधव, राजेंद्र भोसले, नितीन वैद्य, जयंत राळेरासकर, सुनील सर्जे, नितीन दिवाकर, पुरुषोत्तम नगरकर, पूजा अचलकर, वंदना कुलकर्णी, डॉ. नीलिमा निशानदार, रेणुका बुधारम, संगीता बादरायणी, मुकुंद हिंगणे, विजय साळुंके, सुशांत कुलकर्णी, निर्मला मठपती, शिरीष देखणे आदी कलावंत व साहित्यिक उपस्थित होते.