अन्… सोशल मीडियावर गाजतोय ‘वैभव विभूतीचे’ ट्रेंड

  • वीरशैव व्हीजन महिला आघाडीचा उपक्रम
  • केली कोरोना मुक्तीसाठी प्रार्थना…

सध्या महिलांमध्ये साडी चॅलेंज, नथीचा नखरा अनेक ट्रेंड अथवा चॅलेंज चालू आहेत. त्यामध्ये महिला त्या ट्रेंडप्रमाणे फोटो काढून अथवा व्हिडिओ करून सोशल मीडियावर अपलोड करीत आहेत.
त्याच पद्धतीने वीरशैव व्हीजन महिला आघाडीच्या वतीने ‘वैभव विभूतीचे’ हा ट्रेंड सुरु करण्यात आला आहे. यामध्ये आपल्या कपाळावर विभूती लावून त्याचा फोटो व व्हिडीओ काढून तो सोशल मीडियावर अपलोड करावयाचे आवाहन करण्यात आले आहे. त्याचबरोबर कोरोनातून मुक्त कर अशी प्रार्थना ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यांच्याकडे या माध्यमातून करत असल्याचे वीरशैव व्हीजन महिला आघाडी अध्यक्षा वर्षा काशेट्टी यांनी सांगितले.

‘वैभव विभूतीचे’ या ट्रेंडद्वारे लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच वीरशैव धर्म आचरणाचा संदेश देण्याबरोबरच विभूतीचे महत्व व विभूती लावण्याचे कारण सांगण्याचा प्रयत्न वीरशैव व्हीजन महिला आघाडी करत आहे.
विभूती लावणे हे भगवान शंकराच्याप्रती सन्मान व्यक्त करण्याचा प्रकार मानला जातो. विभूतीमधील तीनही रेषा प्रतिकात्मक मानल्या जातात. पहिली रेषा अहंकाराला दूर करण्याचे प्रतिक आहे. दुसरी रेषा अज्ञानपणा दूर करण्याचे प्रतिक आहे आणि तिसरी रेषा वाईट कर्मांना दूर करण्याचे प्रतीक आहे.
विभूती लावल्यामुळे शरीरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. विभूतीमुळे शरीरातील सात चक्र नियंत्रित करण्यास मदत होते. विभूती मस्तकावर धारण केल्याने ध्यान, शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले राहण्यास मदत होते. विभूती शरीरासाठी खुप उपयुक्त मानण्यात येते. विभूतीमुळे डोकेदुखी व एलर्जी दूर होण्यास मदत होते.
वीरशैव व्हीजन महिला आघाडीच्या ‘वैभव विभूतीचे’ या ट्रेंडला समाजातून खूप मोठा प्रतिसाद मिळत आहे. केवळ महिलाच नव्हे तर तर पुरुष मंडळी, लहान मुले, मुली व तरुणतरुणी देखील मोठ्या उत्साहाने या ट्रेंडमध्ये सहभागी होत असल्याचे कार्याध्यक्षा रेणुका सर्जे-चाकोते यांनी सांगितले.
हा ट्रेंड यशस्वी करण्यासाठी वीरशैव व्हीजन महिला आघाडी अध्यक्षा वर्षा काशेट्टी, उपाध्यक्षा आशा पाटील, सचिवा माधुरी बिराजदार, सहसचिवा श्रीदेवी पाच्छापुरे-कोनापुरे, कार्याध्यक्षा रेणुका सर्जे-चाकोते, सहकार्याध्यक्षा पल्लवी हुमनाबादकर, कोषाध्यक्षा ज्योती शेटे, सहकोषाध्यक्षा राजश्री गोटे, प्रसिद्धीप्रमुख सुचित्रा बिराजदार, रेणुका धुमाळे, स्वीटी करजगीकर, कल्पना तोटद, रेश्मा निडगुंडी, पूजा साखरे, गायत्री गाढवे, गौरी खंडाळे, अमृता नकाते, पुष्पा कत्ते, दीपा तोटद, मंगल परशेट्टी, अरुंधती शेटे आदी परिश्रम घेत आहेत.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

10 लाख दे नाहीतर ; उपमहापौर राजेश काळेंसह साथीदारांवर गुन्हा दाखल

MH13 News Network सोलापूर महानगरपालिकेतील उपमहापौर राजेश काळे यांच्या विरोधात आणखीन एक गुन्हा दाखल झाला…

9 hours ago

ग्रामीण भागात आढळले101 ‘पॉझिटिव्ह’ ;या भागातील 10 जणांचा मृत्यू

MH13News Network सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आज शनिवारी दि.17 ऑक्टोबर रोजी ग्रामीण भागातील 101 जणांचे…

3 days ago

सोलापूर | एकही मृत्यू नाही ; बरे झाले 80 तर 24 जण पॉझिटिव्ह ; या भागातील…

MH13 News Network सोलापूर शहर हद्दीत आज शनिवारी दि.17 ऑक्टोंबर रोजी कोरोनाचे 24 रुग्ण आढळले…

3 days ago

ऐन सणाच्या दिवशी ‘पाणीबाणी’ ; कधी थांबणार सावळागोंधळ…

MH13 NEWS Network सोलापुरात आज घटस्थापनेच्या दिवशी शहराला पाणीपुरवठा झाला नसल्याने अनेक ठिकाणी नागरिकांचा रोष…

3 days ago

खाजगी सावकारी | अनिल चांगभले आत्महत्या प्रकरणी अटकपूर्व जामीन मंजूर…पहा हकीकत…

सोलापुरातील अनिल नागनाथ चांगभले जुनी मिल चाळ येथे राहणाऱ्या व्यक्तीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी किरण तायप्पा…

4 days ago

चक्क सोलापुरात भरवली ‘मड बाईक रेस स्पर्धा’…आणि म्हणाले…

अनेक ठिकाणी वेगवेगळ्या स्पर्धेचे आयोजन केले जाते.मात्र सोलापूर स्मार्ट सिटी की खड्डे सिटी असा उपरोधिक…

4 days ago