Categories: राजकीय

अन् …महापौरांनी अंगणात केला राज्य सरकारचा निषेध

सोलापूर- राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार अपयशी ठरले आहे याचा निषेध म्हणून आज महाराष्ट्रात तसेच सोलापूर शहरात आपापल्या घरी आंदोलन करण्यात येत आहे. ‘मेरा आंगण मेरा रणांगण’ आंदोलन करून राज्य सरकारचा निषेध करत असल्याचं महापौर श्रीकांचना यन्नम यांनी सांगितले. आपल्या निवासस्थानी परिवारासह सरकारचा निषेध व्यक्त केला.सोलापूर शहरात कोरोनाचा रुग्ण वाढत आहे. प्रशासनाच्या वतीने आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहे. पण राज्य सरकारकडून अपेक्षित तेवढी मदत मिळत नाही याची खंत वाटत आहे.

राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 40 हजारांच्या वर गेली आहे. पंधराशेच्या वर लोक मरण पावले आहेत. तरीही या राज्य सरकारला याचा गांभीर्य नाही राज्यात कोरोनाचा उद्रेक दिवसेंदिवस वाढत आहे. हॉस्पिटल भरलेले आहेत रुग्णांना अंबुलन्स मिळत नाही तरीही या राज्य सरकारला याचे गांभीर्य नाही. देशात कोरोनाच्या एकूण संख्या पैकी 30 टक्के रुग्ण हे महाराष्ट्रातील आहेत तर 24 टक्के रुग्ण एकट्या मुंबईतील आहेत. शिधावाटप करताना झालेला गोंधळ, सरकारला तीन वेळा बदलावे लागलेले नियम यामुळे कोरोना नियंत्रणामध्ये सपशेल अपयशी ठरलेले राज्य सरकारचा निषेध करत आहे.अशी प्रतिक्रिया या वेळी महापौरांनी दिली.

Team MH13NEWS

Share
Published by
Team MH13NEWS

Recent Posts

घसा कोरडाच ; सोलापुरातील मद्यप्रेमींची निराशा

MH13 NEWS Network कोरोना विषयानुसार प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने पाचव्या टप्प्यातील 'अनलॉक वन' ची सुरुवात केली.…

3 hours ago

लॉकडाऊन : जप्त वाहने उद्यापासून ‘अशा’ प्रकारे मिळणार…

MH13 NEWS Network  देशामध्ये कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार दिनांक 23 मार्च…

14 hours ago

Breaking : सोलापुरातील आज 49 रुग्ण झाले बरे तर 43 नवीन बाधित रुग्ण…

MH13 News network आज सायंकाळी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार 160 अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी…

14 hours ago

Breaking – अक्कलकोट शहरासह जिल्ह्यात आढळले 6 नविन बाधित; एकूण संख्या 42 तर बरे झाले 5

MH13 NEWS NETWORK आज सोमवारी दुपारी बारा वाजेपर्यंत सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 'महापालिका क्षेत्र' वगळून…

16 hours ago

जिल्हाधिकारी, आयुक्तांकडून क्वारंटाइन केंद्रांची पाहणी

MH13 NEWS NETWORK         सोलापूर, दि. 1- वालचंद महाविद्यालयाच्या दोन वस्तीगृहात आणि जुळे सोलापूर येथील…

17 hours ago

Breaking ! ‘त्या’ कोरोना बाधित मृत महिलेच्या प्रकरणी यशोधरा हॉस्पिटल विरुद्ध गुन्हा

MH13 NEWS NETWORK सोलापुरातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ माजवणारी घटना घडली असून एका कोरोना बाधित महिलेचा…

19 hours ago