अन्… महापौरांनी दर्शवली कर्तव्यदक्षता ; ‘तो’ कार्यक्रम केला रद्द…

MH13NEWS Network

काही वेळापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सूचना दिल्या त्याप्रमाणे राज्यभरातील पर्यटनस्थळे, तीर्थस्थळे येथे गर्दी नियंत्रण करतानाच जनजागृती व्यापक प्रमाणात करावी. यात्रा, शासकीय कार्यक्रम पूर्णपणे रद्द करावेत. जे परदेशातून प्रवास करुन आले आहे त्यांनी 14 दिवसांपर्यंत घरीच थांबावे. आंतरराष्ट्रीय विमानतळे असलेल्या शहरांमध्ये विलगीकरण आणि क्वॉरंटाईनची सुविधा तातडीने निर्माण करावी. जिल्हाधिकाऱ्यांनी आरोग्य सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी पुरेशा प्रमाणात मास्क उपलब्ध व्हावेत याचा आढावा घ्यावा. प्रत्येक शहरातील टुर ऑपरेटर्सनी परदेश प्रवास केलेल्या आणि सध्या परदेशात असलेल्या प्रवाशांची यादी प्रशासनाला द्यावी, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जिल्हा प्रशासनाला दिल्या.

प्रथम नागरिक असलेल्या सोलापूरच्या महापौरांनी तातडीने आजचा मानपत्र व सत्कार समारंभ रद्द केल्याचं जाहीर केलं.आज गुरुवारी सोलापूर महानगरपालिकेचे वतीने शहरातील समाजकार्य, राजकीय,उद्योजक,पत्रकार, संपादक,खेळाडू अश्या विविध उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा मानपत्र व सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. तो कार्यक्रम कोरोना या संसर्गजन्य रोगाच्या बचावात्मक काळजीपोटी घेतला असल्याचं त्यांनी कळवले आहे.पुढील तारीख नंतर         कळवण्यात येईल असं हि त्यांनी बोलताना सांगितले.

विशेष म्हणजे सोलापूर महानगरपालिकेच्या महिला बालकल्याण समितीच्या सभापतीसह तब्बल 40 ते 45 जणांचा ग्रुप अभ्यास दौऱ्याच्या नावाखाली फिरतो आहे.त्यामुळे त्यांचा जीव धोक्यात असल्याने त्यास विविध सामाजिक संघटनांनी मोठ्या प्रमाणावर विरोध दर्शवला आहे. महिला बालकल्याण सभापती याबाबत कोणता निर्णय घेणार याकडे सोलापूरकरांचा लक्ष लागून राहिलं आहे

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

घसा कोरडाच ; सोलापुरातील मद्यप्रेमींची निराशा

MH13 NEWS Network कोरोना विषयानुसार प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने पाचव्या टप्प्यातील 'अनलॉक वन' ची सुरुवात केली.…

2 hours ago

लॉकडाऊन : जप्त वाहने उद्यापासून ‘अशा’ प्रकारे मिळणार…

MH13 NEWS Network  देशामध्ये कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार दिनांक 23 मार्च…

13 hours ago

Breaking : सोलापुरातील आज 49 रुग्ण झाले बरे तर 43 नवीन बाधित रुग्ण…

MH13 News network आज सायंकाळी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार 160 अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी…

13 hours ago

Breaking – अक्कलकोट शहरासह जिल्ह्यात आढळले 6 नविन बाधित; एकूण संख्या 42 तर बरे झाले 5

MH13 NEWS NETWORK आज सोमवारी दुपारी बारा वाजेपर्यंत सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 'महापालिका क्षेत्र' वगळून…

16 hours ago

जिल्हाधिकारी, आयुक्तांकडून क्वारंटाइन केंद्रांची पाहणी

MH13 NEWS NETWORK         सोलापूर, दि. 1- वालचंद महाविद्यालयाच्या दोन वस्तीगृहात आणि जुळे सोलापूर येथील…

16 hours ago

Breaking ! ‘त्या’ कोरोना बाधित मृत महिलेच्या प्रकरणी यशोधरा हॉस्पिटल विरुद्ध गुन्हा

MH13 NEWS NETWORK सोलापुरातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ माजवणारी घटना घडली असून एका कोरोना बाधित महिलेचा…

18 hours ago