Categories: सामाजिक

सेवाव्रतीचा अस्त; काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री आनंदराव देवकते यांचे निधन

(वेब, टीम)

दक्षिण सोलापूर तालुक्याचे माजी आमदार तथा राज्याचे माजी दुग्ध व मत्स्य विकास मंत्री, धनगर समाजाचे नेते आनंदराव देवकते यांचे राजूर येथे शुक्रवारी सायंकाळी निधन झाले.

दक्षिण सोलापूरमधून देवकते यांनी 1978 सालापासून 25 वर्षे विधानसभेवर प्रतिनिधित्व केले होते. 1992-93 साली तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या विरोधात पक्षांतर्गत झालेल्या उठावात स्वत: शंकरराव चव्हाणनिष्ठ असूनदेखील देवकते यांनी आक्रमक भूमिका बजावली होती. 1999 ते 2003 या कालावधीत त्यांनी दुग्धविकास व पशुसंवर्धन खात्याचे कॅबिनेट मंत्रिपदही सांभाळले होते. नंतर ‘महानंदा’चे अध्यक्षपदही भूषविले होते.
2003 साली सुशीलकुमार शिंदे हे मुख्यमंत्री झाले. तेव्हा देवकते यांनी शिंदे यांच्यासाठी आमदारकी सोडली होती. नंतर सोलापूर लोकसभा पोटनिवडणुकीत देवकते यांना काँग्रेसने संधी दिली असता त्यांचा पराभव झाला होता.

त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच दक्षिण सोलापूर तालुक्यात शोककळा पसरली आहे. त्यांचा अंत्यविधी उद्या शनिवार रोजी दु.३ वा. राहते गावी राजुर येथे होणार असल्याचे नातेवाईकांनी सांगितले आहे.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

बिग बी अमिताभ,अभिषेक कोरोना पॉझिटिव्ह ; रुग्णालयात दाखल

MH13 News Network  बॉलिवूड चा महानायक अमिताभ बच्चन यांना कोरोना पॉझिटिव्ह झाला असून त्यांना उपचारासाठी…

10 hours ago

Breaking | महानायक अमिताभ बच्चन कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई - बिग बी अमिताभ बच्चन यांना मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. बच्चन यांची…

18 hours ago

Breaking | सोलापुरात 16 जुलै पासून पूर्ण संचारबंदी ; कलेक्टर, आयुक्त, पोलीस कमिशनर यांनी…

MH13 News Network सोलापूर, दि.11 : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी 16 जुलै ते 26 जुलै या…

19 hours ago

अनलॉक सोलापूर | पुन्हा 86 कोरोनाबाधित ; दोघांचा मृत्यू

MH 13 News Network सोलापूर शहर परिसरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे…

20 hours ago

निर्णय झाला | सोळा तारखेच्या मध्यरात्रीपासून कडक संचारबंदी लागू … वाचा सविस्तर

MH13 news Network सोलापूर महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये तसेच काही तालुक्यांमध्ये दहा दिवसाची संचार बंदी लागू करणार…

20 hours ago

धक्कादायक | ग्रामीण भागात 107 पॉझिटिव्ह ; 2 जणांचा मृत्यू

MH 13 News Network  सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण व नगरपालिका क्षेत्र दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या…

21 hours ago