श्रावण | मंदिरांवर स्पीकर लावण्यास परवानगी द्या -आ.देशमुख

श्रावणनिमित्त मंदिरांवर स्पीकर लावण्यास परवानगी द्या
आ. विजयकुमार देशमुख यांची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी.

हिंदू धर्मातील पवित्र महिना समजला जाणार्‍या श्रावण मासानिमित्त मंदिरांमध्ये स्पीकर लावण्यास परवानगी देण्यात यावी, अशी मागणी माजी पालकमंत्री तथा आ. विजयकुमार देशमुख यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
आ. देशमुख यांनी याबाबत निवेदनात म्हटले आहे की,
सध्या श्रावण मास सुरु असल्याने अनेक मंदिरांमध्ये धार्मिक विधी पार पडत असतात, पण यंदा कोरोना आपत्तीमुळे मंदिरांमध्ये भाविकांना बंदी आहे. केवळ मंदिरांमध्ये नित्योपचार करण्यास पुरोहितांना परवानगी आहे. कोरोनामुळे भाविकांना मंदिरात मनाई असल्याच्या नियमाचे सर्व भाविकांकडून पालन केले जात आहे. श्रावण मासानिमित्त मंदिरांमध्ये दैनंदिन मंत्रोपचार, नित्योपचार व आरतीवेळेस मंदिरात स्पीकर लावण्यास परवानगी देण्यात यावी, अशी मागणी अनेक भाविकांकडून होत आहे. त्यामुळे नित्योपचार, मंत्रोपोचार तसेच आरतीवेळी सकाळी व संध्याकाळी मंदिरांना स्पीकर लावण्यास परवानगी देण्यात यावी. श्रावण महिन्यात भक्तीचा माहोल असतो. पण कोरोनामुळे मंदिरात जाऊन भाविकांना देवाचे दर्शन घेता येणार नसल्याने निदान मंदिरांमध्ये स्पीकर लावण्यास परवानगी द्यावी, जेणेकरुन भाविकांच्या धार्मिक भावनांची दखल होईल, असे आ. विजयकुमार देशमुख यांनी निवेदनात म्हटले आहे.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

10 लाख दे नाहीतर ; उपमहापौर राजेश काळेंसह साथीदारांवर गुन्हा दाखल

MH13 News Network सोलापूर महानगरपालिकेतील उपमहापौर राजेश काळे यांच्या विरोधात आणखीन एक गुन्हा दाखल झाला…

8 hours ago

ग्रामीण भागात आढळले101 ‘पॉझिटिव्ह’ ;या भागातील 10 जणांचा मृत्यू

MH13News Network सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आज शनिवारी दि.17 ऑक्टोबर रोजी ग्रामीण भागातील 101 जणांचे…

3 days ago

सोलापूर | एकही मृत्यू नाही ; बरे झाले 80 तर 24 जण पॉझिटिव्ह ; या भागातील…

MH13 News Network सोलापूर शहर हद्दीत आज शनिवारी दि.17 ऑक्टोंबर रोजी कोरोनाचे 24 रुग्ण आढळले…

3 days ago

ऐन सणाच्या दिवशी ‘पाणीबाणी’ ; कधी थांबणार सावळागोंधळ…

MH13 NEWS Network सोलापुरात आज घटस्थापनेच्या दिवशी शहराला पाणीपुरवठा झाला नसल्याने अनेक ठिकाणी नागरिकांचा रोष…

3 days ago

खाजगी सावकारी | अनिल चांगभले आत्महत्या प्रकरणी अटकपूर्व जामीन मंजूर…पहा हकीकत…

सोलापुरातील अनिल नागनाथ चांगभले जुनी मिल चाळ येथे राहणाऱ्या व्यक्तीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी किरण तायप्पा…

4 days ago

चक्क सोलापुरात भरवली ‘मड बाईक रेस स्पर्धा’…आणि म्हणाले…

अनेक ठिकाणी वेगवेगळ्या स्पर्धेचे आयोजन केले जाते.मात्र सोलापूर स्मार्ट सिटी की खड्डे सिटी असा उपरोधिक…

4 days ago