‘या’ बार्शीच्या सुपुत्राच्या ‘भट्टी’ची झिंग ; थेट डोक्यात.. वाचा

0

‘भट्टी’ म्हटले की सामान्यपणे विटांची किंवा आणखी कशाची भट्टी आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. पण दारुची ‘भट्टी’ हा अनेक गावांमध्ये चालणारा व्यवसाय आणि त्याचे चित्रण, बार्शीच्या अहमद शेख या तरुण लेखकाने आपल्या डोळ्यासमोर उभे राहील असे केले आहे. समाजात आपल्या आजुबाजूला असणाऱ्या एका विशिष्ट वर्गाच्या चित्रणाची ‘भट्टी’ चांगलीच जमून आली आहे.

या पुस्तकाचे प्रकाशन रविवारी २९ डिसेंबर रोजी एका जाहीर कार्यक्रमात प्रसिद्ध लेखक सुनील आंबेकर यांच्या हस्ते पुण्यात करण्यात आले. समाजस्वास्थ बिघडविणाऱ्या दारुनिर्मितीच्या ज्वलंत विषयावर भाष्य करणाऱ्या या कादंबरीचे कौतुक करतानाच समाजातील विशिष्ट घटकाचे चित्रण यानिमित्ताने समोर आले असल्याचे मत आंबेकर यांनी यावेळी व्यक्त केले. व्यास क्रिएशन्सने या पुस्तकाचे प्रकाशन केले असून प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभूणे यांनी पुस्तकाची प्रस्तावना लिहीली आहे. या कादंबरीची भाषा, त्यातील प्रसंग, आर्थिक व्यवहार यांमुळे भट्टीशी निगडित असलेल्या लोकांचे आयुष्य आपल्यासमोर अक्षरश: उभे राहते. कादंबरी लहान असली तरी त्याचा पट मात्र मोठा आहे.

बार्शी आणि परिसरात पूर्वी चालणाऱ्या दारूच्या भट्ट्यांचं सटीक वर्णन अहमद शेख यांनी या कादंबरीत केलं आहे. तसेच अहमद शेख हे स्वतः पत्रकार असून विविध वृत्तवाहिन्या तसेच वर्तमानपत्रांतून त्यांनी पत्रकारिता केली आहे. सध्या ते राज्य शासनाच्या राज्य मराठी विकास संस्थेत उपक्रम अधिकारी म्हणून काम पहातात. बार्शीच्या सुपुत्राने लिहिलेल्या कादंबरीची चर्चा प्रकाशनाच्या दिवसापासूनच सर्वत्र होतेय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here