अभिजित कानडे यांच्या सकारात्मकतेला सलाम – डॉ. बी.पी. रोंगे

पंढरपूर‘स्वेरीचे माजी विद्यार्थी अभिजीत कानडे हे विद्यार्थी दशेत असताना अत्यंत सकारात्मक विचारसरणीचे होते. त्यामुळे त्यांचे कार्य विशेष लक्षात रहात होते.अभ्यास करण्याची वृत्ती आणि नेतृत्व गुण या त्यांच्या गुणांचे इतर विद्यार्थी अनुकरण करायचे असे हे विद्यार्थी प्रिय मित्र अचानक आपल्यातून निघून गेले असून त्यांच्या कार्याला सलाम.अशा शब्दात स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांनी कै.अभिजीत कानडे यांना श्रद्धांजली वाहिली.

स्वेरी संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरिंग या विभागातून २००३ साली उत्तीर्ण झाल्यानंतर अभिजीत आनंदराव कानडे हे पुण्याच्या ए.व्ही. इंडस्ट्रीजमध्ये नोकरीसाठी रुजू झाले. काल ( दि. ०८ डिसेंबर २०१९) त्यांचे पुण्यात हृदय विकाराने दुर्दैवी निधन झाले. स्वेरी कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यापासून ते कालपर्यंत स्वेरीच्या वाटचालीकडे सतत लक्ष ठेवून असणारे अभिजित कानडे यांच्या अकस्मात निधनाने मोठा धक्का बसला आहे. स्वेरीमध्ये कै.अभिजित कानडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली.यावेळी विद्यार्थी अधिष्ठाता डॉ.अभय उत्पात यांच्यासह अनेक प्राध्यापकांनी त्यांचा अनुभव व त्यांच्या कार्याबाबत माहिती दिली. यावेळी स्वेरी कॅम्पसचे इन्चार्ज प्रा. एम. एम. पवार विद्यार्थी अधिष्ठाता डॉ.अभय उत्पात, प्रवेश प्रक्रिया अधिष्ठाता डॉ. धनंजय चौधरी, सांस्कृतिक विभागाचे प्रमुख प्रा. करण पाटील, इलेक्ट्रीकल इंजिनिअरींगच्या विभागप्रमुख डॉ. दीप्ती तंबोळी, डॉ. माधव राऊळ, ग्रंथपाल प्रा. एस. एम. बागल, प्रा. जे.ए. केंदुळे, प्रा.प्रज्ञा भुसे, प्रा.दिग्विजय रोंगे, प्रा. पी.जी.गायकवाड, बालाजी सुरवसे व स्वेरीचे प्राध्यापक वर्ग उपस्थित होते.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

‘रोहन’चा वाढदिवस ठरला आरोग्यदायी ; प्रतिबंधित क्षेत्रात केली अशी मदत

मुलाच्या वाढदिवसानिमित्त प्रतिबंधित क्षेत्रात आर्सेनिक अल्बम 30 या होमीओपॕथीक गोळ्यांचे मोफत वाटप केल्याने मुलगा रोहन…

2 hours ago

Morning Update : 4 पुरुष तर 3 महिला बाधित ; 1 मृत

MH13 NEWS Network  आज सोमवारी सकाळी  7 बाधित रुग्णांची वाढ झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली…

9 hours ago

सोलापुरात नव्याने 18 पॉझिटिव्ह रुग्ण ; 5 जणांचा मृत्यू

आज प्राप्त झालेले एकूण अहवाल 120 असून निगेटिव्ह अहवाल 102 आहेत. पॉझिटिव्ह अहवाल 18 आढळून…

22 hours ago

सध्या 19 हॉस्पिटल ; म. फुले जनआरोग्य योजनेत सहभागी व्हावे.!

जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर प्रदीप कुमार ढेले यांचे आवाहन सोलापूर दि. 24 - सोलापूर शहर आणि…

23 hours ago

Live : संकटात ‘राजकारणा’पेक्षा जबाबदारी पार पाडणे महत्वाचे- मुख्यमंत्री ठाकरे

लॉकडाऊन शिथिल करतांना विविध क्षेत्रांना गती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबई दिनांक २४: संकटाच्या काळात राजकारण न…

1 day ago

मोठा निर्णय : राज्यातील सर्व नागरिकांना मिळणार महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ

MH13 NEWS Network  मुंबई, दि. २४: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व नागरिकांना महात्मा फुले जन आरोग्य…

1 day ago