By-MH13 NEWS,वेब/टीम
कठोर निर्णय घेणारा आणि तितकाच निरागस असणारा एक महान नेता म्हणजे बाळासाहेब ठाकरे असून आपल्याकडे 90 आमदार आहेत म्हणून त्यांनी कोणावर दबाव टाकला नाही. महात्मा गांधी नंतर सत्तेच्या बाहेर बसून बाळासाहेबांनी सत्तेवर हुकूमत गाजवली असे स्पष्ट मत ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी व्यक्त केले
सुवर्ण गणपती युवक प्रतिष्ठान,हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान व शिवसेना शहर उत्तर तर्फे रविवारी 20 जानेवारी रोजी किर्लोस्कर सभागृहात ‘आठवणीतले बाळासाहेब’ या व्याख्यानप्रसंगी भाऊ तोरसेकर बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. शिवरत्न शेटे होते.व्यासपीठावर लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील,प्रताप चव्हाण,हरिभाऊ चौगुले, मिलिंद मोटे, नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर,अमोल शिंदे ,अमोल जोशी, कार्यक्रमाचे संयोजक बाळासाहेब गायकवाड, राजकुमार पाटील,सुनील कामाटी ,महेश धाराशिवकर,सदानंद येलुरे, राजकुमार पाटील आदी उपस्थित होते.
बाळासाहेबांच्या राजकारणात व्याख्या नव्हत्या जे जनतेच्या हिताचं तेच करणार असा त्यांचा बाणा होता. ज्याचा स्वतःवर विश्वास असतो. इतिहास त्यांचाच असतो असेही त्यांनी आपल्या व्याख्यानात सांगितले .पुढे बोलताना ते म्हणाले की,’ चौकटीमध्ये राहणारी लोक इतिहास घडवू शकत नाहीत त्याच सोबत आधुनिक शिक्षण आणि कायद्याचे राज्य माणसाला नपुंसक बनवतं. आजच्या महामार्गाची संकल्पना ही बाळासाहेबांची होती. मुंबई पुणे रस्ता करताना त्यांनी दूरदृष्टी ठेवली .त्यांना व्यंग दिसत होतं तसा विकास ही दिसत होता. असेही भाऊ तोरसेकर यांनी व्याख्यानात सांगितले.
बाळासाहेब प्रशिक्षित राजकारणी नव्हते मात्र त्यांच्याकडे विशिष्ट असा दृष्टिकोन होता. 45 वर्ष एक पक्ष चालून त्यांनी तळागळातील लोकांना सत्तेची पदे बहाल केली. बाळासाहेबांच्या अंत्ययात्रेला आलेली 30 ते 35 लाख लोकं हेच भविष्यात दंतकथा असतील. एकविसाव्या शतकातील बाळासाहेब पुढील पिढीसाठी दंतकथा असतील त्याच सोबत ‘मुंबई हेच बाळासाहेबांचे स्मारक’ असे प्रतिपादन त्यांनी व्याख्यानात केले.
संयोजक बाळासाहेब गायकवाड यांनी प्रास्ताविक केले .डॉ.शिवरत्न शेटे यांनी अध्यक्षीय मनोगतातून बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्याची सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमास तरुणांची उपस्थिती लक्षणीय होती.
सोलापूर : प्रतिनिधी तब्बल ५० प्रकारांच्या ४८० दुकानांतील कोणत्याही खरेदीवर २० हजार रुपयांपर्यंतचे फायदे देणाऱ्या…
सोलापूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी पुन्हा एकदा धडाकेबाज कारवाई करून उत्तम…
महेश हणमे / 9890440480 सोलापूर महानगरपालिकेतील प्रशासकीय इमारतीमध्ये जन्म-मृत्यूची नोंद घेतली जाते. आणि या संदर्भातील…
महेश हणमे -9890440480 सोलापूर महानगरपालिकेच्या इंद्रभुवनचे फायर ऑडिट तब्बल 9 वर्षे झाले नाही. यासंदर्भात एम…
महेश हणमे /9890440480 सोलापूर महानगरपालिकेची स्थापना 1 मे 1964 रोजी झाली. शहरातीलच नव्हे तर जिल्ह्यातील…