Categories: कृषी

आक्रोश मोर्चाद्वारे बाजार समितीवर ‘कांदा फेको’ आंदोलन

एमएच१३न्यूज वेब/टीम

प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्यावतीने आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर आक्रोश मोर्चा काढून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधले. बाजार समितीमधील शेतकऱ्याला झालेली अमानुष मारहाण  तसेच शेतकऱ्यांना मिळणाऱ्या अपुऱ्या सुविधांबाबत प्रशासनाला धारेवर धरले. आंदोलकांनी बाजार समितीच्या सचिवांचे कार्यालय गाठून दालना समोरच कांदा फेकून आंदोलन केले.

संपूर्ण महाराष्ट्र मध्ये कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झालेला असताना सुद्धा गद्दार पाकिस्तान सारख्या राष्ट्राकडून कांदा खरेदी करणे म्हणजे हा देशद्रोह नव्हे का ?असा सवाल विचारत कांद्याला प्रतिक्विंटल १२०० रुपये प्रमाणे अनुदान देण्यात यावे अशी मागणी शहर प्रमुख अजित कुलकर्णी यांनी केली.

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत सोलापूर शहर प्रमुख अजित कुलकर्णी यांनी प्रशासनाला प्रश्नांचा भडीमार करताच प्रशासन अधिकारी पदाधिकारी गोंधळून गेले होते.संघटनेच्या आक्रमकतेमुळे बाजार समिती सचिव निंबाळकर यांनी तात्काळ सर्व मागण्या मान्य करण्याचे तसेच उरलेल्या मागण्या सर्वसाधारण सभेमध्ये ठेवण्याचे आश्वासन दिले.

या आंदोलनात जिल्हाप्रमुख दत्तात्रय मस्के पाटील, शहर कार्याध्यक्ष खालीद मणियार, उपप्रमुख मुस्ताक शेख संधी ,नवनाथ साळुंखे ,संभाजी व्हनमाने ,शब्बीर नदाफ ,मजीत पटेल आयाज शेख ,आसिफ शेख, एम एस मोर्डे अनेक शेतकरी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

‘तुळशी विवाह’ साजरा करण्याची पद्धत, दर्शनाचे महत्त्व, आध्यात्मिक वैशिष्ट्ये

तुळशी विवाह या वर्षी तुळशी विवाह कालावधी कार्तिक शुद्ध द्वादशी (२६ नोव्हेंबर) पासून ते कार्तिक…

7 hours ago

आता…तुम्हीच ‘स्वामी’ ; जिल्ह्यात आढळले 247 शिक्षक अन् कर्मचारी ‘पॉझिटिव्ह’ तर 17167 जण…

महेश हणमे /9890440480 सोलापूर जिल्ह्यातील शाळा सुरू झाल्या. कोरोनामुळे अनेक महिने बंद असलेल्या मुक्या शाळा…

1 day ago

Breaking | घंटा वाजली ; सोलापुरातील 11 शिक्षक ,दोन शिपाई कोरोनाबाधित ; 943 अहवाल अजूनही पेंडिंग…

महेश हणमे /9890440480 सोलापूर (Solapur City) शहरातील शाळा सुरू झाल्या असून त्या पार्श्वभूमीवर शहर परिसरातील…

1 day ago

निराधारांना दिली एम.के.फाऊंडेशने मायेची उब !

पहाटेच्या सुमारास शेकडो निराधाराना ब्लॅंकेट वाटप. चोर पावलांनी येणाऱ्या थंडी पासून बचाव करण्यासाठी उबदार कपड्यांची…

3 days ago

सोलापूर | सोमवारी वाजणार शाळांची घंटा ; असं आहे नियोजन

MH13 News Network सोलापूर शहरातील शाळांची घंटा उद्यापासून वाजणार असून त्या अनुषंगाने संसर्ग वाढू नये…

4 days ago

‘पक्का जॉब’ | सरळ जॉइनिंग जाहिरातीने घातला गंडा ; महिलेची फसवणूक

महेश हणमे/9890440480 विविध प्रकारच्या जाहिरातीमुळे अनेकदा फसवणूक झाल्याच्या घटना घडतात .व्यवस्थित माहिती न घेतल्यामुळे सोलापूर…

4 days ago