स्मार्ट ८३ कर्मचाऱ्यांना बढतीची भेट

महापालिकेत यंदाची दिवाळी झाली गोड

0
6

(वेब/टीम)

महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी अशा एकूण 83 जणांना बढती देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सोमवारी आयुक्तांच्या कक्षात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे महापालिकेत यंदाची दिवाळी गोड झाली आहे.
महापालिकेच्या वर्तुळात डॉ.अविनाश ढाकणे यांची बदली होण्याची चर्चा जोरात सुरू असतानाच आयुक्तांनी मात्र जाताना महापालिकेतील कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट दिल्याची मोठी चर्चा इंद्रभवन आवारात आवारात सुरू आहे.

सोमवारी आयुक्तांच्या कक्षात झालेल्या डीपीसीच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. महापालिकेच्या करापोटी सिंहगड इन्स्टिट्यूटच्या सतरा बसेस जप्त करून आवारात ठेवण्यात आलेल्या आहेत. या बसेसचा लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येणार आहे. सोमवारी आरटीओच्या अधिकाऱ्यांनी सिंहगडच्या बसेसची पाहणी करून मूल्यांकनची प्रक्रिया सुरू केली आहे. अधिकाऱ्यांनी मूल्यांकनचा अहवाल दिल्यानंतर लिलावाची प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. शहरातील दोन उड्डाणपुलांसाठी रस्ता रुंदीकरण योजनेस शासनाने मंजुरी दिली असून सध्याचा२१ मीटरचा रस्ता ४१ मीटर करण्यास आणि काही ठिकाणी त्यापेक्षा अधिक मीटरच्या रस्ता रुंदीकरणास मंजुरी मिळालेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here