80 कोटी नागरिकांना मिळणार 2 रुपयात गहू आणि 3 रुपयात तांदूळ !

MH13NEWS Network

कोरोनामुळे देशावर मोठं संकट ओढवलं आहे. या आजारामुळे अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशात लॉकडाऊनची घोषणा करावी लागली.हातावर पोट असणाऱ्या लोकांना,गरीब कुटुंबांना सरकारने दिलासा दिला आहे. केंद्र सरकारने देशातील 80 कोटी नागरिकांना दर महिन्याला प्रती व्यक्ती 27 किलो रुपयांचे गहू अवघ्या 2 रुपयांना आणि प्रती किलो 34 रुपये किंमतीचे असणारे तांदूळ फक्त 3 रुपयांत देण्याचा निर्णय घेतला आहे.

पंतप्रधान  मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेतला. या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषद घेतली.

कोरोनाचा प्रादूर्भाव वाढू नये यासाठी सरकारने देशातील जनतेला घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे. मात्र, जीवनाश्यक वस्तू खरेदीसाठी बाहेर पडण्याची मुभा सरकारने दिली आहे. याशिवाय सर्व जीवनाश्यक सेवा सुरु असून किराणा, रेशनचे दुकान सुरु असणार आहेत”, अशी ग्वाही प्रकाश जावडेकर यांनी दिली.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

अंत्योदय लाभार्थ्यांना 11 एप्रिल नंतर मोफत धान्य वाटप

सोलापूर दि. 5 : प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना…

12 hours ago

लॉकडाऊन : पोलिसांचा ‘ॲक्शन’ मोड ; शेकडो वाहने जागेवरच जप्त

MH13 NEWS Network कोरोना च्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉक डाऊन जाहीर केलेले आहे,मात्र अनेक लोक…

14 hours ago

महाराष्ट्रातील लॉकडाऊन वाढणार; आरोग्यमंत्र्यांचे संकेत

मुंबई – कोरोना व्हायरसचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असून सध्या राज्यात 490 रुग्ण आहेत. गेल्या 24…

1 day ago

धक्कादायक :1023 तबलिगींना कोरोनाची लागण; देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 2902 वर

नवी दिल्ली | देशात एकूण कोरोनाग्रस्तांपैकी 30 टक्के लोक तबलिगी जमातीशी संबंधित आहेत. देशातील 17…

1 day ago

मुख्यमंत्र्यांकडून झालेल्या कौतुकामुळे आराध्याचे कुटुंबिय भारावले

दि. 4 : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केलेल्या कौतुकामुळे आराध्या कडूचे कुटुंबिय भारावून गेले. आराध्याने…

1 day ago