Breaking – अक्कलकोट शहरासह जिल्ह्यात आढळले 6 नविन बाधित; एकूण संख्या 42 तर बरे झाले 5

MH13 NEWS NETWORK

आज सोमवारी दुपारी बारा वाजेपर्यंत सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ‘महापालिका क्षेत्र’ वगळून नवीन सहा कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत यामध्ये चार पुरुष व दोन महिलांचा समावेश असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली आहे

आज दुपारी बारा वाजेपर्यंत ग्रामीण भागातील 125 वैद्यकीय अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी 119 निगेटिव्ह आले आहेत तर 6 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 4 पुरुष व 2 महिलांचा समावेश आहे. आज जे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले त्या रुग्णांमध्ये ते अक्कलकोट शहरातील मधला मारुती गल्ली येथील 2 पुरुष, अक्कलकोट मधीलच उत्कर्ष नगर येथील 1 महिला, अक्कलकोट शहरातील संजय नगर येथील 1 पुरुष, उत्तर सोलापूर तालुक्यातील तळे हिप्परगा येथील 1 महिला आणि पंढरपूर तालुक्यातील बार्डी  येथील 1 पुरुषाचा समावेश आहे. अक्कलकोट मध्ये आढळलेले रुग्ण हे यापूर्वीच्या बाधित व्यक्तीच्या संपर्कातील आहेत अशी माहिती जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने दिले आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील तळे हिप्परगा येथे आढळलेली कोरोनाबाधित महिला ही नवी मुंबई येथून आलेली आहे. तर बार्डी मध्ये  आढळलेला पॉझिटिव्ह पुरुष हा पुणेवरून आला असल्याची माहिती देण्यात आली आहे.
सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आजपर्यंत एकूण 42 जण बाधित आहेत.  त्यामध्ये 25 महिला 17 पुरुषांचा समावेश होतो. दरम्यान ग्रामीण भागातील 3 पुरुष व 2 महिला अशा पाच जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून रुग्णालयात 32 जण उपचार घेत आहेत. तर दिलासादायक बाब म्हणजे कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींची संख्या 5 आहे.  बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे अशी माहिती जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

Team MH13NEWS

Share
Published by
Team MH13NEWS

Recent Posts

सोलापूर | आज कोरोनामुक्त 73 तर 84 पॉझिटिव्ह ; 5 जणांचा मृत्यू

MH 13 News Network सोलापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज सोमवारी 163  वैद्यकीय अहवाल प्राप्त झाले .त्यापैकी…

18 hours ago

‘सारथी’ | बंद होणार नाही, स्वायत्तता कायम ; 8 कोटींचा निधी उपलब्ध

MH13 News Network  ‘सारथी’चा कारभार राजर्षी शाहूंचा गौरव वाढवणारा असेल, सर्वस्व पणाला लावणार; ‘व्हिजन 2020-30’…

20 hours ago

हॉटस्पॉट | ग्रामीण भागात तब्बल 66 नवे कोरोना रुग्ण ; एकूण संख्या 673

MH13 News Network  सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण व नगरपालिका क्षेत्र दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत…

21 hours ago

पोह्यात जिवंत ‘अळी’ ; क्वांरटाईन सेंटर मधील धक्कादायक प्रकार

MH13 News Network  सोलापुरातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे या पार्श्वभूमीवर संसर्गित रुग्णांच्या संपर्कात…

1 day ago

9 ×7 | आजपासून शहरातील मार्केट, दुकाने सुरू…वाचा सविस्तर

MH13 News Network  कोरोना विषाणू च्या पार्श्वभूमीवर सर्वत्र अनलॉकची प्रक्रिया सुरू झालेली आहे. सोलापूर महानगरपालिका…

1 day ago

सोलापूर | कोरोनामुक्त 59 तर 90 पॉझिटिव्ह ; पाच जणांचा मृत्यू

MH 13 News Network सोलापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज बुधवारी 232 वैद्यकीय अहवाल प्राप्त झाले .त्यापैकी…

2 days ago