57 अहवाल निगेटिव्ह ; नवीन रुग्णांची भर नाही- जिल्हाधिकारी

MH13 NEWS Network

सोलापूरमध्ये आत्तापर्यंत 15 व्यक्तीं कोरोना बाधित म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत .त्यापैकी पाच्छा पेठ येथील किराणा दुकानदाराचा आणि इंदिरानगर मधील महिलेचा मृतांमध्ये समावेश आहे. आज 57 चाचणी अहवाल आले असून ते सर्व निगेटिव्ह आहेत. अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज रविवारी सायंकाळी दिली.

इंदिरानगर परिसरातील त्या बाधित महिलेच्या संपर्कात…

इंदिरा नगर परिसरातील ‘त्या’ बाधित महिलेच्या प्राथमिक संपर्कात आठ व्यक्ती होत्या .त्यांना तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटल येथे पाठवण्यात आले आहे व त्यांची तपासणी करण्यात येत असून इतर संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्याचे काम सुरू होते .सोलापूर जिल्ह्यातील मनपा क्षेत्र मध्ये आतापर्यंत एकूण 15 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून त्यापैकी दोन व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे.

कोरोनाचा संसर्ग या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सहकार्य करावे . त्यांना ताप ,सर्दी ,खोकला असेल त्यांनी स्वतः नजीकच्या दवाखान्यात जाऊन स्वतः तपासणी करून घ्यावी व प्रशासनाला सहकार्य करावे असं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे.

3 कंटेनमेंट झोन घोषित

आज सकाळी 70 फूट रोड जवळील इंदिरानगर परिसर कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आले आहे.या नजीकच्या परिसरात पोलिस बंदोबस्त वाढवला आहे. तसेच हा परिसर सील करण्यात आला आहे .त्या आधी पाच्छा पेठ परिसर प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आलेला आहे.तसेच रविवार पेठचा ही यामध्ये समावेश आहे. या प्रतिबंधित क्षेत्रामध्ये साडेतीनशे पोलिस कर्मचारी कार्यरत असून 88 आरोग्य कर्मचाऱ्यांची टीम येथे तैनात आहे नऊ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली या तिन्ही ठिकाणी सर्वेक्षण केले जात आहे.

कोरोना : सोलापुर जिल्ह्यातील सद्य परिस्थिती

१) होम क्वॉरंटाइन झालेल्या एकूण व्यक्ती : 1742

२) होम क्वॉरंटाइन पूर्ण केलेल्या व्यक्ती : 687 (14 दिवस कालावधी पूर्ण)

३) अद्याप होम क्वॉरंटाइनमध्ये असलेल्या : 1055 (हाताला शिक्के लावलेले)

४) इन्स्टिट्यूशनल क्वॉरंटाइन मध्ये
1078 व्यक्ती होत्या. त्यापैकी 426 जणांचा कालावधी पूर्ण झालेला आहे. तर 652 व्यक्ती अद्यापही इन्स्टिट्यूशनल क्वॉरंटाइन मध्ये असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

५) आयसोलेशन वॉर्डमध्ये 755 रुग्ण, तपासणी पूर्ण केलेल्या 563 व्यक्ती (तपासणी अहवाल प्राप्त)
548  व्यक्ती निगेटिव्ह .15 व्यक्ती पॉझिटिव्ह त्यामध्ये 2 मृत व्यक्तीचा समावेश आहे. 57 व्यक्तींचे अहवाल आज प्राप्त झाले ते सर्व निगेटिव्ह आहेत उर्वरित 13 व्यक्तींचे उपचार सिव्हील हॉस्पिटलमध्ये सुरू आहेत.

आज सकाळी इंदिरानगरमधील जी महिला मृत घोषित करण्यात आली होती. त्यांच्या संपर्कातील 47 जणांना ताब्यात घेतले असून त्यांची तपासणी करण्यात येत आहे. पुढील अहवाल आल्यानंतर योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केलं आहे.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

‘तुळशी विवाह’ साजरा करण्याची पद्धत, दर्शनाचे महत्त्व, आध्यात्मिक वैशिष्ट्ये

तुळशी विवाह या वर्षी तुळशी विवाह कालावधी कार्तिक शुद्ध द्वादशी (२६ नोव्हेंबर) पासून ते कार्तिक…

7 hours ago

आता…तुम्हीच ‘स्वामी’ ; जिल्ह्यात आढळले 247 शिक्षक अन् कर्मचारी ‘पॉझिटिव्ह’ तर 17167 जण…

महेश हणमे /9890440480 सोलापूर जिल्ह्यातील शाळा सुरू झाल्या. कोरोनामुळे अनेक महिने बंद असलेल्या मुक्या शाळा…

1 day ago

Breaking | घंटा वाजली ; सोलापुरातील 11 शिक्षक ,दोन शिपाई कोरोनाबाधित ; 943 अहवाल अजूनही पेंडिंग…

महेश हणमे /9890440480 सोलापूर (Solapur City) शहरातील शाळा सुरू झाल्या असून त्या पार्श्वभूमीवर शहर परिसरातील…

1 day ago

निराधारांना दिली एम.के.फाऊंडेशने मायेची उब !

पहाटेच्या सुमारास शेकडो निराधाराना ब्लॅंकेट वाटप. चोर पावलांनी येणाऱ्या थंडी पासून बचाव करण्यासाठी उबदार कपड्यांची…

3 days ago

सोलापूर | सोमवारी वाजणार शाळांची घंटा ; असं आहे नियोजन

MH13 News Network सोलापूर शहरातील शाळांची घंटा उद्यापासून वाजणार असून त्या अनुषंगाने संसर्ग वाढू नये…

4 days ago

‘पक्का जॉब’ | सरळ जॉइनिंग जाहिरातीने घातला गंडा ; महिलेची फसवणूक

महेश हणमे/9890440480 विविध प्रकारच्या जाहिरातीमुळे अनेकदा फसवणूक झाल्याच्या घटना घडतात .व्यवस्थित माहिती न घेतल्यामुळे सोलापूर…

4 days ago