Categories: सामाजिक

अस्सल भान | ‘या’ मोबाइल विक्रेत्याने व्यसनाधीन ग्राहकांना केली दुकानबंदी ; वाचा हटके बातमी…

सोलापूर :  आजची तरुण पिढी देशाचे उद्याचे उज्ज्वल भविष्य मानले जाते. परंतु आधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण असलेल्या २१ व्या शतकात तरुण पिढीला विविध व्यसनांनी ग्रासले आहे. एवढेच नव्हे तर सध्या अन्नापेक्षा व्यसन महाग झाले असूनही आजची भावी पिढी व्यसनाच्या विळख्यात गुरफटून गेली आहे. व्यसनच्या या विनाशकारी वादळात सापडलेल्या तरुणाईला बाहेर काढण्यासाठी माढ्यातील एका मोबाइल विक्रेत्याने तंबाखू, दारू, गुटखा, सिगारेट सारखे व्यसन करून येणाऱ्या लोकांना दुकान बंदी केली आहे.

प्रा. बापूराव घुले असं त्या दुकानविक्रेत्यांचे नाव आहे. ३२ वर्षीय  या तरुण प्राध्यापकाचे  माढा तालुक्यातील शिवाजीनगर सोलापूर रोड परिसरात कर्मवीर मोबाइल शॉपी आहे. श्री. घुले हे अनगर येथे कै. शंकराव बाजीराव पाटील उच्च माध्यमिक विद्यालयात प्राध्यापक म्हणून २०११ पासून कार्यरत आहेत. नोकरीसोबतच त्यांनी व्यवसाय म्हणून २०१५ मोबाइल शॉपी सुरू केली. या यादरम्यान त्यांना बहुतांश तरुण पिढी आणि लोक व्यसनाच्या आहारी गेलेले त्यांना दिसून आले.

व्यसनाच्या मगरमिठीतून सोडविण्यासाठी त्यांनी एक नवा फंडा सुरू केला. आपल्या दुकानात मोबाईल घेण्यास आलेल्या व्यसनी ग्राहकांना दुकानबंदी केली. तंबाखू, सिगारेट, दारू, गांजा यासारख्या व्यसनी पदार्थांचे सेवन करून आलेल्या दुकानबंदी असेल, यासंबंधीचा फलकच चक्क दुकानासमोर लावला. मादक पदार्थांचे सेवन करून आलेल्या ग्राहकांना त्यांनी परत पाठवले आहे. यातून त्यांचा व्यवसायात तोटा होतो हे माहित असतानाही त्यांनी व्यसनापायी ओढवून घेतलेल्या मानसिक गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी व्यसनाधीन लोकांना दुकान बंदी केली.

श्री. घुले हे फायनान्सवर मोबाइल देखील देतात. जे लोक अथवा तरूणाई व्यसन करणं सोडून देईन, अशी हमी दिल्यानंतर ते फायनान्सच्या माध्यमातून दहा हजार रुपये किंमतीच्या आतील मोबाइल देतात. व्यसनाधीन संबंधी लावलेला फलक पाहून अनेकजण याविषयी चौकशी करतात. किमान हा फलक पाहून लोकांच्या मानसिकतेत बदल होईल, ही अशा घुले यांना आहे.
श्री. घुले हे सकाळी ७ ते १० यावेळेत महाविद्यालयात अध्यापनाचे काम करतात, तर उर्वरित वेळेत मोबाइल शॉपी चालवितात.

व्यसनापासून चार हात दूर

व्यसनमुक्तीसाठी चालविलेला हा फंडा चर्चेचा विषय ठरत आहे.
व्यसनाची सवय लागलेल्या तरुणांना सातत्याने समुपदेशन करुन अनेकांना व्यसनमुक्त केले. व्यसनमुक्त झालेले काही तरुण आज त्याच्या मोबाइल शॉपीमध्ये काम करत आहेत. आतापर्यत साठ लोक व्यसनमुक्त केले असल्याचे श्री. घुले यांनी सांगितले.

व्यसनाधीनतेवर भरपूर काम व्हावे
प्रा. बापूराव घुले

व्यसनरूपी विनाशकारी वादळाची तीव्रता भयंकर आहे. फक्त इच्छाशक्तीच्या बळावर व्यसन सुटू शकत नाही. त्याला योग्य प्रयत्नांची जोड, योग्य मार्गदर्शन तसेच योग्य औषधोपचारांची साथ हवी. प्रत्येक गावात समाजसेवी संस्थांनी हा विषय हाती घेणे, आवश्यक आहे. अन्यथा व्यसनाच्या विनाशकारी जाळय़ामध्ये अडकलेली युवा पिढी कधीच बाहेर येणार नाही.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

‘तुळशी विवाह’ साजरा करण्याची पद्धत, दर्शनाचे महत्त्व, आध्यात्मिक वैशिष्ट्ये

तुळशी विवाह या वर्षी तुळशी विवाह कालावधी कार्तिक शुद्ध द्वादशी (२६ नोव्हेंबर) पासून ते कार्तिक…

7 hours ago

आता…तुम्हीच ‘स्वामी’ ; जिल्ह्यात आढळले 247 शिक्षक अन् कर्मचारी ‘पॉझिटिव्ह’ तर 17167 जण…

महेश हणमे /9890440480 सोलापूर जिल्ह्यातील शाळा सुरू झाल्या. कोरोनामुळे अनेक महिने बंद असलेल्या मुक्या शाळा…

1 day ago

Breaking | घंटा वाजली ; सोलापुरातील 11 शिक्षक ,दोन शिपाई कोरोनाबाधित ; 943 अहवाल अजूनही पेंडिंग…

महेश हणमे /9890440480 सोलापूर (Solapur City) शहरातील शाळा सुरू झाल्या असून त्या पार्श्वभूमीवर शहर परिसरातील…

1 day ago

निराधारांना दिली एम.के.फाऊंडेशने मायेची उब !

पहाटेच्या सुमारास शेकडो निराधाराना ब्लॅंकेट वाटप. चोर पावलांनी येणाऱ्या थंडी पासून बचाव करण्यासाठी उबदार कपड्यांची…

3 days ago

सोलापूर | सोमवारी वाजणार शाळांची घंटा ; असं आहे नियोजन

MH13 News Network सोलापूर शहरातील शाळांची घंटा उद्यापासून वाजणार असून त्या अनुषंगाने संसर्ग वाढू नये…

4 days ago

‘पक्का जॉब’ | सरळ जॉइनिंग जाहिरातीने घातला गंडा ; महिलेची फसवणूक

महेश हणमे/9890440480 विविध प्रकारच्या जाहिरातीमुळे अनेकदा फसवणूक झाल्याच्या घटना घडतात .व्यवस्थित माहिती न घेतल्यामुळे सोलापूर…

4 days ago